एटीएम चोरटे सैराटच

0

भुसावळ– भुसावळसह किनगाव व धानोर्‍यात एटीएम फोडून बडोद्यात उच्छाद मांडणार्‍या एटीएम चोरटे अद्यापही सैराटच असल्याने पोलीस प्रशासनास त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. चोरटे चोपडामार्गे शिरपूर व तेथून बडोद्याकडे पसार झाल्याचा संशय असून या भागातील फुटेज प्राप्त केले जात असल्याचे सूत्रांकडून समजते. परप्रांतीय चोरट्यांना शोधण्याचे यंत्रणेपुढे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.