जळगाव । सध्या लग्न सराई सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची भासते आहे. उन्हाची तिव्रता प्रचंड असतांना सोमवारी 15 रोजी शहरातील बहुतांश एटीएम रोकड नसल्याने तसेच विविध तांत्रिक कारणाने बंद होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. काही एटीएममध्ये पैसे असतांना देखील पैसे मिळत नसल्याने भर उन्हात नागरिकांना पायपीट करावी लागली. मात्र बहुतांश एटीएम बंद असल्याने नागरिकांचे भ्रम निराश झाले. व्हायरस मुळे एटीएम मशिनमध्ये अडचण आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य प्रबंधक शिरीष कोल्हे यांच्याशी संपर्क साधले असता. त्यांनी बँक कर्मचार्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. देशात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी चलनातील पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा बदं केल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत असल्याने नागरिक आधिच त्रस्त आहे. त्यात व्हायरस मुळे अडचण येत असल्याने वाढ झाली आहे.