A woman in Bhusawla was cheated of Rs.One Lakh भुसावळ : एटीएम कार्ड ब्लॉक होईल, असे सांगून शहरातील गांधी नगरातील महिलेला भामट्यांनी एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
प्रज्ञा जितेंद्र परदेशी (40, गांधी नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, बुधवार, 23 रोजी सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास संशयीत रवी वर्मा व राकेश कुमार यांनी भ्रमणध्वनी करून एटीएम कार्ड होईल, असे सांगून त्यांचे खात्याचे तपशील मिळवून गुगल पेच्या माध्यमातून एक लाख रुपयांची फसवणूक केली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.