एटीएसकडून पुन्हा दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी !

0

मुंबई-महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री मुंब्रा आणि औरंगाबादेतून या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी औरंगाबादच्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका २४ वर्षीय आरोपीकडून लॅपटॉप, हार्डडिस्क, टॅबलेट, पेनड्राईव्हस, राऊटर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयावरून एटीएसने २२ जानेवारीला मुंब्रा आणि औरंगाबादमधून एकूण ९ जणांना अटक केली होती. आता ही संख्या ११ वर गेली आहे.

औरंगाबादमध्ये कैसर कॉलनी, गणेश कॉलनी या भागात एटीएस चे पथक स्लीपरसेल मधे समाविष्ठ असलेल्या संशयितांची कसून चौकशी करत आहे.अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.