शेंदुर्णी । येथील गरूड महाविद्यालयात रासेयो एकाकमार्फत रेड रिबीन क्लबची स्थापना करण्यात आली. 15 विद्यार्थ्यांच्या या क्लबच्या माध्यमातून वर्षभर जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयात शेंदुर्णी येथील महालक्ष्मी हॉस्पीटलच्या डॉ. सीमा शिंदे यांनी एडस्: भयंकर रोग कारणे व उपाय या विषयावर व्याख्यान दिले. त्या म्हणाले की, एडस् हा एक महाभयंकर रोग असून त्यावर प्रतिबंध व जनजागृती करणे हाच उपाय आहे. सुरक्षित यौन संबंध तसेच संस्कारक्षम जीवन जगून आपण यावर मात करू शकतो. वेळोवेळी तपासण्या करणे गरजेचे आहे. हा रोग रक्ताच्या माध्यमातून पसरतो. समाजामध्ये जाऊन युवकांनी प्रबोधन करावे, अशी माहिती देण्यात आली.
यानिमित्ताने एडस् या विषयावर पोस्टर्स व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील हे होते. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी. गवारे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. पी.जे. सोनवणे यांनी केले. आभार प्रा. योगिता चौधरी यांनी मानले. या प्रसंगी प्रा. डॉ. एस.डब्ल्यू.भोळे, प्रा.अमर जावळे, प्रा. आर.जी.पाटील, प्रा. डॉ.पी.एस. देशमुख, प्रा. एस.जी. डेहरकर, प्रा. आप्पा महाजन, प्रा. एन.बी. वानखेडे, प्रा. डी.एच. धारगावे, तसेच शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.