जळगाव । छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भिषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हुतात्मा झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली एचआयव्ही बाधीत बालकांतर्फे वाहण्यात आली. या हल्ल्याचा निषेधाचा ठराव फारूख शेख यांनी मांडला. विर जवानांना दोन मिनीटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैनचे फारूख शेख, रायसोनी इन्सीट्युटच्या डॉ. प्रिती अग्रवाल, जैन मेटल्सचे उल्हास जैन, डॉ. अण्णासाहेब जि. डी. बेंडाळेच्या प्रा. डॉ. अनिता कोल्हे, अंकुश प्रतिष्ठानच्या मनिषा बागुल, संगीता पाटील आदी उपस्थि होते.
एचआयव्ही बाधीतांसोबत जेवण
एचआयव्ही संसर्गीत मुलांना भरवलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशतर्फे दरमाह सकस आहाराचे वाटप केले जाते. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते या मुलांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी सकस आहार देतांना जिल्हाधिकार्यांनी मायेने या बालकांच्या डोक्यावर हात फिरवून आर्शीवाद दिला. यावेळी जिल्हाधिकार्यांना या मुलांना 25 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जेवण व दंगल हा चित्रपट दाखविणार असल्याची घोषणा केली.
यांनी दिला सकस आहार
एचआयव्ही बाधीत रूग्णांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. यात भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन (150 पाकीटे), भालचंद्र पाटील, पिपल्स बँक (10 पाकीटे), समर्पण संस्था, रायसोनी कॉलेज(10 पाकीटे), जळगाव जिल्हा मुस्लीम मनियार बिरादरी(20 पाकीटे), महावीर क्लासेस (5 पाकीटे), आर. को. रोडवेज(5 पाकीटे), जैन मेटल्स(2 पाकीटे) वाटप केलेत.
यांनी पाहिले कामकाज
एचआयव्ही बाधीत मुलांना सकस आहार वाटप करतांना जिल्हाधिकार्यांनी मुलांना जेवणाचे निमंत्रण देवून त्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरविला. यावेळी वातावरण धीरगंभीर बनले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूख शेख यांनी तर आभार अंकुर प्रतिष्ठानच्या मनिषा बागुल यानं केले. प्रमुख अतिथींचे स्वागत गोपाळ भुसारी व वैशाली मराठे या मुलांनी केले.