एनआयएची कारवाई: आयसिसचे पाच संशयित ताब्यात

0

नवी दिल्ली : आयसिस या दहशतवादी संघटनेचा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयएन) मोठा कट उधळला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण १६ ठिकाणांवर छापेमारी करत आयसिसच्या ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ या संघटनेकडील स्फोटके ताब्यात घेतली आहे.

याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये सोहेल उर्फ हाफिज नावाच्या एका युवकाचा समावेश आहे. हाफिज या मॉड्युलचा कथित गँगस्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ संघटनेशी निगडीत सर्व सदस्य सोशल मीडियाच्या माध्यातून संपर्कात आले होते असे सांगितले आहे. अमरोहा येथून अटक करण्यात आलेल्या हाफिजच्या वडिलांना दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास साध्या वेशात जवळपास सहा लोक त्यांच्या घरी आले. त्यानंतर घराची झडती घेतली. मात्र, याठिकाणी त्यांना काही मिळाले नाही.