कामगारांची निदर्शने, लाभ मिळण्याची मागणी
भुसावळ – मायलेज दरांची घोषणा करुनही प्रत्यक्ष लाभाबाबत विलंब होत असल्याने एआयआरएफच्या सूचनेनुसार सोमवारी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. फलाट क्रमांक तीनवरील रनिंग लॉबीमधून कर्मचार्यांचा मोर्चा डीआरएम कार्यालयावर धडकला.
एनआरएमयुचे महामंत्री वेणू पी. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली रनींग कर्मचारी व अन्य विभागांच्या कर्मचा्रयांचा सहभाग असलेला मोर्चा काढण्यात आला. यावेळी कामगारांनी शासनाच्या धोरणांविषयी घोषणाबाजी करुन मायलेज दरांची घोषणा करुनही कामगारांना लाभ मिळत नसल्याबाबत संताप व्यक्त केला. मार्चात खंडवा शाखेचे सचिव आदित्य कुमार सिंग, मंडळ अध्यक्ष इब्राहिम खान, मंडळ सचिव पुष्पेंद्र कापडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कापडे यांनी शासनाकडून मिळणारा मोबदल्यावर आमचा अधिकार आहे. यामुळे आम्ही खैरातीमध्ये लाभाची मागणी करीत नसून आमचा अधिकार आम्हास दिला जावा, अन्यथा कर्मचारी आंदोलन कायम ठेवतील असा इशाराही त्यांनी दिला. यासह अरविंद खंबायत, अरुण धांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी टी. आर. पांडव, इसरार खान, एस. बी. तळेकर, डी. आर. सयाम, राजेश सिंग, राजेश तायडे, आर.एम. सिंग, एस. एस. वानखेडे, मो. असलम, एस. के. चौरसिया, डी. जी. मोरे, अरुण सिंग, ए. के. मुळे आदी उपस्थित होते.