एनआरएमयुच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासन झुकले

0

सर्व मागण्यांना मंजुरी ; गार्डसह लोकोपायलटला मोठा दिलासा

भुसावळ- लोको पायलट तसेच रेल्वे गार्डच्या विविध समस्यांबाबत वारंवार प्रशासनाशी चर्चा करूनही प्रश्‍न सुटत नसल्याने एनआरएमयू संघटनेने भुसावळ दौर्‍यावर आलेल्या जी.एम.डी.के.शर्मा यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा निर्धार केल्यानंतर पदाधिकारी एनआरएमयू कार्यालयात जमले व डीआरएम कार्यालयात आंदोलनाच्या तयारीत असतानाच रेल्वे प्रशासनाने युनियनच्या मागण्यांबाबत सकारात्मक दर्शवल्याने लोको पायलटसह गार्ड कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी पदाधिकार्‍यांनी एडीआरएम यांच्या कॅबीनमध्ये दीर्घकाळ चर्चा केली. यावेळी ऑन रन इंजिनात बिघाड झाल्यास लोकोपायलटसह सहा.लोकोपायलटला चार्जशीट देणे थांबवण्यासह अन्य 18 मागण्या मान्य करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली.

या मागण्यांना मिळाली मंजुरी
गार्ड कर्मचार्‍यांना लाईन बॉक्सच्या ठिकाणी ट्रॉली बॅग देण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, विना गार्ड मालगाडीचे संचालन थांबवावे, साऊथ सेंट्रल रेल्वेचे अकोला येथील रनिंग रूम भुसावळ मंडळातील मालगाडीच्या क्रुला पाठवणे थांबवावे, मालगाडी गार्डची रीक्त पदे तत्काळ भरावीत, यार्डात चार तासांच्या ड्युटीनंतर लागलीच रीलीफ मिळावा, चेजींग बीटला क्रुला चेंज करावे, रनिंग रूममध्ये किमान सहा तासांची रनिंग स्टाफला विश्रांती मिळावी, लोकोपायलट यांना विना लाईन बॉक्सचे संचालन त्वरीत थांबवावे, बडनेरा यार्डातून स्टेशनपर्यंत गार्ड व चालकास वाहन उपलब्ध करावे, असुरक्षित शंटींग तत्काळ थांबवावी, भुसावळ मंडळातील सर्व रनिंग रूमचे तत्काळ इन्स्पेक्शन करावे, विभागातील सर्व रनिंग रूमला एसी बसवावेत, लोकोपायलट व गार्ड करून जास्त काम करणे तत्काळ थांबवणे यासह एकूण 18 मागण्या मान्य करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली.

यांची होती उपस्थिती
मंडल सचिव आर.आर.निकम, मंडल अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, अध्यक्ष आर.पी.भालेराव, सचिव ए.टी.खंबायत, इब्राहीम खान, प्रदीप गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी प्रदीप गायकवाड, एस.बी.तळेकर, अनिल मालविया, मो.असलम, सुरेश वानखेडे, डी.बी.महाजन, चौरसीया, राजेश तायडे, आर.एम.सिंग, धांडे, किरण नेमाडे, एम.पी.चौधरी, आर.के.मिश्रा, आर.के.पांडे, सैय्यद सादीक, चेतन चौधरी, इम्रान खान, के.एन.सिंग, एस.ए.श्रीनाथ, सरबजीत सिंग, ए.व्ही.अडकमोल, पी.आर.भोसले, कमलेश शुक्ला, योगेश व्यवहारे, जी.बी.शिरसाठ, ए.बी.भोसले, भरत कोलते, जे.एस.सोनवणे, व्ही.एस.आचार्य, एस.के.सिन्हा व युनियन पदाधिकारी, सदस्यांनी परीश्रम घेतले.