एनआरएमयुतर्फे रेल्वे रुग्णालयास अ‍ॅम्ब्युलन्स भेट

0

भुसावळ। नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे युनियनच्या खात्यातून नवीन अ‍ॅम्ब्युलन्स रेल्वे रुग्णालयास प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मंडल रेल प्रबंधक आर.के. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. पंचरत्न, वरिष्ठ कार्मिक अधिकारी डॉ. तुशाबा शिंदे, एनआरएमयु महामंत्री वेणु पी. नायर, मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, मंडळ सचिव इब्राहिम खान, हबिब खान उपस्थित होते.

युनियनच्या सामाजिक कार्याची माहिती
याप्रसंगी मंडल रेल प्रबंधक आर.के. यादव यांनी एनआरएमयुच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. महामंत्री नायर यांनी युनियनने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. युनियनतर्फे लातूर, भुज, सायक्लोन अशा आपदा आल्या असता त्याप्रसंगी मदत केली. तसेच रेल्वे रुग्णालयास अ‍ॅम्ब्युलन्स भेट दिल्यामुळे कर्मचार्‍यांच्या परिवारास आपत्कालिन परिस्थितीत याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष टी.आर. पांडव, अजमल खान, रवी चौधरी, युवराज इंगळे, रुपसिंग पाटील, दिपक सुर्यवंशी, जयसिंग महाजन, वसंत पथराड, राजकुमार गवळी, संजय गौतम, प्रमोद भारंबे, एन.ए. सैय्यद, वैभव पाटील, ललित भारंबे, ए.टी. खंबायत, राजेश तायडे, सचिन महाजन, एच.के. चौरसिया, एस.एस. वानखेडे, ए.के. कुळकर्णी, शशिकांत मकासरे, शशी मकासरे, निसार खान, रवी खरात आदींनी परिश्रम घेतले.