एनआरएमयूच्या साखळी उपोषणाची सांगता

0

भुसावळ- डीआरएम कार्यालायासमोर सरकारच्या संरक्षा व कामगार विरोधी धोरणाविरुद्ध नॅशनल रेल्वे मजदूर संघातर्फे 7 ते 10 मे दरम्यान सुरू करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या आंदोलनात सुमारे 200-200 कर्मचारी सहभागी झाले होते. या साखळी उपोषणाची सांगता 10 रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली. यावेळी मंडळ सचिव पुष्पेंद्र कापडे आणि सहकार्‍यांनी डीआरएम आर. के. यादव यांना निवेदन सादर केले.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
या निवेदनात प्रशासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी केल्यानुसार रेल्वेतील 2.4 लाख रिक्त जागा भरणे., नवीन पेन्शन स्कीम बंद करणे, रनिंग कर्मचार्‍यांना किलोमीटर अलाउंस, लार्जेस स्किम परत चालु करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मंडळ सचिव कापडे, अध्यक्ष इब्राहिम खान यांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर कामगारांना माहिती दिली. मागण्या मान्य न झाल्यास सरकारला त्याचे परीणाम भोगावे लगतील, असा ईशारा दिला व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी गजेंद्र ढोले, टी.आर.पांडव, अरुण धांडे, प्रकाश बेंडाळे, शशिकांत मकासरे, अजमल खान, रवी चौधरी, युवराज इंगळे, रुपसिंग पाटील, राजेंद्र भोरटक्के, भवानी शंकर, वाय.व्ही.पाटील, एस.एस.वानखेडे, जयसिंग महाजन, वसंत पथराड, ललित भारंबे, नरेंद्र कुुटुरवार, प्रवीण शर्मा, योगेश बारी, आर.आर.निकम, निसार खान, दीपक कागडा, वसंत शर्मा, डी.यु.कोळी, अनिल मिसाळ, विकास सोनवणे, विकास कुलकर्णी, आर.एस.साळुंके, किरण सोनवणे, संतोष प्रजापती, सुनील निकम, निनू नाफडे, गुरुदत्त मकासरे, व्ही.एस.पाटील, ए.एस.झोपे,नरेंद्र सोनवणे, रमेश परदेशी, नीलेश कुलकर्णी, अजय चाबुकस्वार, अखतर, नरेंद्र वाघ, प्रविण बागुल, सुनंदा डांगे यांनी परीश्रम घेतले.