भुसावळ : एनआरएमयू महामंत्री कॉ.वेणू नायर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरातील रेल्वे रुग्णालयात दिडशे रुग्णांना रेल्वे रनिंग शाखेतर्फे शुक्रवारी फळ वाटप करण्यात आले. मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ.राजीव, सहाय्यक मुख्य चिकित्सा अधिकारी श्रवण कुमार उपस्थित होते. नाहाटा महाविद्यालयाजवळील मनोहर संदानशीव संचलित विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शाखेच्या पदाधिकार्यांतर्फे ब्लँकेट, शालेय उपयोग वस्तू, पुस्तके वाटप करण्यात आली. शाखा सचिव ए.टी.खंबायत, शाखा अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी कोविड काळे कॉ.वेणू नायर यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वसतिगृह संचालक मनोहर संदानशीव यांनी कोविड काळात अविरत काम करणार्या रेल्वे कर्मचार्यांचे कौतुक केले.
यांची होती उपस्थिती
पुंडलिक श्रीपत बर्हाटे शाळेचे मुख्याध्यापक चौधरी, ईसीसी सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष आर.पी.भालेराव, शाम तळेकर, ए.व्ही.अडकमोल, के.एन.सिंग, एच.के.चौरसिया, मोहम्मद असलम, संजय श्रीनाथ, अनिल मालविया, सचिन वाघ, हरी मोहन, किरण नेमाडे यांच्यासह वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून वेणू नायर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.