नवी दिल्ली: केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा आणि आता राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायदा केला आहे. या कायद्याला देशभरात विरोध होत आहे. प्रत्येक शहरात मोर्चे निघाले. सरकारने हा कायदा रद्द करण्याची मागणी होत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या कायद्याला विरोध केला आहे. एनआरसी-एनपीआर हा कायदा देशातील गरिबांवर लावलेला कर असल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे. नोटबंदी हा गरिबांवर हल्ला होता. त्यानंतर आता एनआरसी-एनपीआर कायदा आणून भाजप सरकारने देशातील नागरिकांवर कर लादले असल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे. देशात फुट पडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मताचे राजकारण होत असल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे.