एनआरसी, कॅब विरोधात कोलकात्यात विराट मोर्चा

0

कोलकाता: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी कायदा संमत केला आहे. या कायद्याला देशभरात विरोध होत आहे. कायद्याच्या विरोधात आंदोलने होत आहे. दरम्यान आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी कोलकात्यात विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला.

देशभरात कॅब आणि एनआरसी कायद्याला विरोध होत असताना भाजपकडून मात्र याचे समर्थन केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द होणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. या कायद्याला मुस्लीम समुदायाला त्रास होणार नसल्याचे सांगत मुस्लीम समुदायाला विरोधकांकडून भडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप भाजपने केले आहे. देशभरात विरोधात मोर्चे निघत असले तरी भाजप आणि भाजप संलग्नित संघटनेकडून समर्थनार्थ मोर्चे निघत आहे.