जळगाव । येथील प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ विनोद जैन सोनोलॉजिस्ट डॉ सोनाली जैन यांना खान्देशातुन पहिल्या प्री एन्ट्री लेवल एनएबीएच ओर्थोपॅडीक व सोनोग्राफी सेंटरसाठी विनोद हॉस्पिटलला मान्यता मिळाली आहे. वैद्दकीय क्षेत्रात एनएबीच ची मान्यता मिळवण्यासाठी अत्यंत कठीण निकष असणारी पध्दत विनोद हॉस्पिटलच्या पथकाने मिळविली आहे.
या उपचारांची सुविधा उपलब्ध
यामध्ये प्रमुख्याने सर्व प्रोसिजर्स, पेशन्टची काळजी घेण्याची पध्दती यात तपासणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच शस्त्रक्रीयेवेळील घेतली जाणारी काळजी, यासारख्या शेकळो बाबी निट व अतिशय बारकाईने तपासल्या जातात.कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळली तर हॉस्पिटलला मान्यता दिली जात नाही नंतर तपासणीसाठी पुन्हा काही महीने वाट पहावी लागते. त्यामुळे एनएबीएच ची मान्यता असणे ही सर्वच हॉस्पिटलसाठी प्रतिष्ठेची बाब असते. शहरात कोणत्याही ऑर्थोपॅडीक, सोनोग्राफीक होस्पिटलला ही मान्यता आजपावोत मिळाली नव्हती. विनोद हॉस्पिटलला ओर्थोर्पडीक, सोनोग्राफी(रेडीओलोजी) शाखेत मान्यता सर्वच शस्त्रक्रियेंसाठी मिळाली आहे. यांत प्रामुख्याने मणक्यांचे पाठींच्या शस्त्रक्रिया,दुर्बिणीतुन होणार्या शस्त्रक्रिया, गुडघे,खुबे सांधाच्या बदलासाठी शस्त्रक्रिया, त्या सोबतच एक्सरे सोनोग्राफी, मॅमोग्राफी,कलर, डॉप्लर यासाठी एनएबीएच प्री एन्ट्री लेव्हल ची मान्यता प्रदान करण्यात आली आहे.