एनएमजी वॅगनची नांदगावजवळ रूळावरून बोगी घसरली

अप मार्गावर रेल्वे गाड्या दोन तास विलंबाने धावल्या

भुसावळ : नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ मालवाहतूक करणार्‍या एनएमजी वॅगनची बोगी घसरल्याची घटना रविवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घसरल्याने मेन लाईनवरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबल्याने सुमारे सात गाड्या दोन तास विलंबाने धावल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.

सात गाड्या धावल्या विलंबाने
नांदगाव स्टेशनजवह मुख्य लाईनवर रविवार, 29 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास एनएमजी वॅगनची इंजिनापासूनची दुसरी बोगी रुळावरून घसरली मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली तर मुख्य लाईनवरील घडलेल्या या प्रकाराने अप लाईन ठप्प झाल्याने सात गाड्या विलंबाने धावल्या. त्यात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अप लाईनवर वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले. अप 11034 दरभंगा-पुणे एक्सप्रेस, 12618 निजामुद्दीन-एर्णाकुलाम मंगला एक्सप्रेस, 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस, 12810 हावडा-मुंबई मेल, 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, 12138 फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल, 12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस या गाड्या दिड ते अडीच तास विलंबाने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.