पुणे । महाराष्ट्र राज्य नववीच्या इतिहास व राज्यशास्त्र पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या विषयी चुकीचा उल्लेख केल्याच्या संदर्भात एन. एस. यु. आय. तर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले.
नववीच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी जो मजकुर लिहलेला आहे. तो चुकीचा व पुर्णपणे दिशाभूल करणारा आहे. गांधी यांनी जनतेच्या भल्यासाठी व समाजवादी समाज रचनेसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले व राबवले याचा उल्लेख न करता फक्त आणीबाणीबाबत लिहून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियातर्फे करण्यात आला. या विरोधात शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.