एनडीए हद्दीतून प्रवास नाकारल्याने ग्रामस्थांचे आंदोलन

0

पिंपरी-चिंचवड :- एनडीए प्रशासनाकडून शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव या गावातील ग्रामस्थांना एनडीए हद्दीतून प्रवास करताना व दैनंदिन कामे करताना अडवणूक केली जाते. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत कोंढवे-धावडे येथील एनडीए गेट बाहेर आंदोलन सुरू आहे.

धनगरबाबा यांच्या उत्सवासाठी आलेल्या भाविकांवर 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी एनडीए प्रशासनाकडून लाठीहल्ला करण्यात आला होता. तसेच भाविकांना बाहेर काढण्यात आले होते. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसेच एनडीए हद्दीत शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे या गावांची आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवस्थान, बापूज्जीबुवा देवस्थान, कमळादेवी देवस्थान आणि धनगरबाबा देवस्थान याची मंदिरे आहेत. या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा अर्चा सन उत्सव होत आले आहेत. परंतू 2107 पासून हे या ठिकाणी सण उत्सव करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास व सण उत्सव साजरे करण्यास ग्रामस्थांना कायमस्वरुपी परवानगी मिळावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.