एनडीला धक्का: कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आणखी एक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. मागील तीन आठवड्यांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे देशभरात केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्मिती झाली आहे. अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणयासाठी एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठविला आहे. ते एनडीएतून बाहेर पडतील असे बोलले जात आहे.

निश्चितच तिन्ही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडे आम्ही यासंदर्भात मागणी देखी केली आहे. एनडीए आघाडीत असल्याने आम्ही त्यांना पत्र देखील पाठवले आहे की, जर तुम्ही हे कायदे परत घेणार नसाल, तर आम्हाला एनडीएच्या पाठिंब्याबाबत पुन्हा विचार करावा लागेल असे बेनिवाल यांनी म्हटले आहे.

बेनीवाल २६ डिसेंबर रोजी दोन लाख समर्थकांसह दिल्लीला रवानना होणार आहेत.