नवापुर। शहरातील दि.एन.डी.एन्ड.एम.वाय.सार्वजनिक उर्दु विभाग येथे अल्पसंख्यांक विकास संस्थेतर्फे विद्यार्थीना दप्तर वाटपाचा करण्यात आले.
अध्यक्षस्थानी उद्योगपती विपिन चोखावाला हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन तहसीलदार प्रमोद वसावे, हाजी शोएब मांदा,संस्था अध्यक्ष जुनेद खान, इंद्रीस पठाण, फारुक खाटीक, सालाओदीन शेख, फरहान, लाखाणी, वसिम शेख, सार्वजनिक गुजराथी हायस्कुलचे मुख्याध्यापक एस. एल. जाधव, आसिफ शेख, उर्दु हायस्कुलचे मुख्यध्यापक शाकीर शेख, शिक्षक फहीम पठाण आदि उपस्थित होते. यावेळी तहसिलदार प्रमोग वसावे म्हणाले की शिक्षणा शिवाय पर्याय नाही. विद्यार्थानी चांंगले शिक्षण घेऊन शिक्षणाची गरुड भरारी घ्यावी. राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचे आदर्श घेतले पाहीजे. संगणक युगात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अपडेट रहाणे गरजेचे असल्याचे वसावे यांनी सांगितले. विपिन चोखावालायांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन झकरीया मन्सुरी यांनी तर आभार जाहीद खान यांनी मानले.