एनसीसीमुळे देशातील युवावर्गाच्या उर्जेला सकारात्मक दिशा

0

फैजपूर । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककामार्फत एनसीसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 18 महाराष्ट्र बटालियन जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल दिलीप पांडे यांना आमंत्रित करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेना भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जास्त युवा असलेली संघटना आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आधीन राहून युवावर्गातील सकारात्मक उर्जेला समाजसेवा आणि देशसेवेसाठी सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. आयुष्यातील कोणत्याही बिकट परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची स्फूर्ती एससीसीतूनच मिळते असे प्रतिपादन कर्नल दिलीप पांडे यांनी केले.

एनसीसीच्या प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करा
सर्वप्रथम महाविद्यालयात प्रथमच भेट दिलेल्या समादेशक अधिकारी कर्नल दिलीप पांडे यांना कॅडेट्सतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी कर्नल पांडे यांनी एनसीसीचे आयुष्यातील महत्व आणि प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले.

उपस्थित मान्यवर
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे होते. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.आय. भंगाळे, उपप्राचार्य प्रा.ए.जी. सरोदे, उपप्राचार्य प्रा.डी.बी. तायडे, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, प्रा. डॉ. जी.एस. मारताळे, एनसीसी अधिकारी प्रा. राजेंद्र राजपूत, ईश्‍वर पाटील, शुभम मोरे, आसिफ शहा, विनायक कोळी, सागर महाले, शुभम चौधरी यांनी परिश्रम घेतले.