शिरपूर । येथील एस.पी.डी.एम महाविद्यालय महात्मा ज्योतिबा फुल माध्यमिक विद्यालय, पांडू बापू माळी विद्यालय येथील एन.सी.सी.विभागातर्फे व पतंजलि योगपिठ यांच्या संयुक्त विद्यमान स्व.दादासाहेब विश्वासरावे रंधे क्रीडा संकुल शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी एन.एल.तडवी यांनी केले. उद्घाटनप्रसंगी एस.पी.डी.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य जी.व्ही.एम.पाटील, जी.डी.बी.पाटील, क्रीडा संचालक एल.के. प्रताळे, एस.पी.डी.एम.महाविद्यालयाचे छात्रसेनाधिकारी कॅप्टन ए.ई.माळी, सेकंड ऑफीसर हेमंत रोटे, फस्ट ऑफीसर, शैलेंद्र निरासे, धुळे जिल्हा पतंजलि युवा भारत प्रभारी जितेंद्र रोटे, तालुका प्रभारी किशोर गुरव, भगवान ठाकुर, मनोज अटवाल, सुनील गुरव, तसेच एस.पी.डी.एम.महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात एन.सी.सी. छात्रसैनिकांनी उभी आसने, बैठे आसने, लोम-विलोम, भ्रमारी, कपालभारती तसेच इतर योगासनाचे प्रात्यक्षिक केली. कार्यक्रमासाठी 49, महाराष्ट्र एनसीसी बटालीयनचे कमांडींग ऑफीसर कर्नल अनिल जाऊन यांनी मार्गदर्शन केले.