एनी डेस्कद्वारे अधिकार्‍याला 98 हजारात गंडवले

Health officer of Talai was cheated online of one lakhs एरंडोल : तालुक्यातील तळई प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी सागर उत्तमराव पाटील (30) यांच्याशी सायबर भामट्याने फोनवरून संपर्क साधत आधी विश्वास संपादन करून अ‍ॅनी डेस्क सॉप्टवेअर इन्स्टॉल करण्यास सांगून त्याद्वारे 98 हजार 976 रुपयांचा गंडा घातला. .या प्रकरणी कासोदा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
तळई आरोग्य केंद्रात सागर उत्तमराव पाटील (30) यांच्या मोबाईलवर 28 मे 2022 रोजी 11 ते 11.30 दरम्यान एका अनोळखी व्यक्तीचा 9872751644, 9692787014 वरील फोन आला व समोरील व्यक्तीने सागर पाटील यांना बोलण्यात गुंतवून अ‍ॅनी डेस्क अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगत पुढील कोड विचारून प्रथम 50 हजार रुपये नंतर 48,976 असा एकूण 98,976 रुपये खात्यातून परस्पर वर्ग केले. या प्रकरणी सागर पाटील यांनी रविवार, रोजी कासोदा पोलिसात अनोळखी नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.