हैदराबाद: हैदराबादमधील वेटरनरी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्यावर पाशवी बलात्कार करून जाळून ठार करण्यात. यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी जनमानसात भावना व्यक्त होती. त्यानंतर आज सकाळी ज्या ठिकाणी बलात्कार झाला होता, त्याच ठिकाणी सर्व चारही आरोपींचे एन्काऊंटर करून ठार करण्यात आले आहे. जनमानसात आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलिसांचे कौतुक होत आहे. परंतु सरकार वकील उज्ज्वल निकम यांनी एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
“पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्कारी मारले गेले याचा आनंद असला तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती आहे,” असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. तेथून आरोपी पळून जात असेल तर पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्कारी मारले गेले याचा आनंद असला तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती आहे असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.