मुंबई: मुंबई पोलिसातील नावाजलेले अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मां आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ते देशभरात विख्यात आहे. प्रदीप शर्मां शिवसेनेत प्रवेश करणार असून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. यावेळीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहे.