एन.एस.ओ-भारतच्या माध्यामातून “गौ विश्वस्यः मातरम, हर घर गाय,बनायेगा भारत आत्मनिर्भर और समरूद्ध” संकल्पना होतेय साकार.
एन.एस.ओ-भारत व आत्मनिर्भर भारत गो-अनुसंधान विभाग जनशक्ती वृत्तपत्र महाराष्ट्र मार्फत “गौ विश्वस्यः मातरम, हर घर गाय,बनायेगा भारत आत्मनिर्भर और समरूद्ध” या संकल्पने ला अनुसरून अनेक अधिक भटके, अपंग तसेच भाकड गो वंशाचे संगोपन अनेक गोशाळेच्या माध्यमातून कोणत्याही शासकीय मदतीशिवाय करत आहे. सध्याच्या घडीला हे काम करत असताना गो-अनुसंधान व गो- साक्षरतेची गरज समाजात वाटत आहे. गायरान जागा ही पूर्णपणे गाईच्या हक्काची असून निवारा व चाऱ्याअभावी गाईवर भटकंतीची वेळ आलेली आहे. गोशाळा ब गोअनुसंधान केंद्र बनविण्यासाठी एन.एस.ओ-भारत व आत्मनिर्भर भारत गो-अनुसंधान विभाग जनशक्ती वृत्तपत्र महाराष्ट्र मार्फत प्रयत्न केले जात आहे.
ह्याच पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने व सामाजिक सहभागाने ह्या नवीन उपक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी भटक्या गायींची सुटका केली आणि त्यांना जबाबदार आणि सक्षम लोकांपर्यंत पोहोचवले. या उपक्रमाद्वारे गायींचे संरक्षण आणि योग्य काळजी घेतली जात आहे. ज्यामुळे समृद्धी आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळते. लोकसभा चांगला असल्याने नक्कीच ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे, आपण देखील ह्या संकल्पनेत आपले योगदान द्या.
गोसेवक यतीन ढाके यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लाभले आहे.
युवा लेखक,गोसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री केतन विलास फिरके हे राष्ट्रीय सामाजीक संगठन (NSO-BHARAT) च्या सचिव पदी असून ते अभियांत्रीकीचे विद्यार्थी आहे व विविध सामाजिक कार्या मध्ये ही ते अग्रेसर आहेत. तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रणजितसिंह राजपूत हे अध्यक्ष आहेत. ह्या संकल्पनेत केतन फिरके व एन.एस.ओ-भारतचा महत्वाचा वाटा आहे. तर विशेष सहकार्य शंकर महाराज शेवाळे मुक्ताई ग्रामीण आदिवासी सेवा ट्रस्ट व गोअमृत सेवा संघाचे जय श्रीराम गोशाळेचे विजय थोरात यांचे आहे.
यामधे होणारे विशेष फायदे हे 1. शेण व गोमुत्र आधारित विविध उत्पादन करून गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे. २. गो आधारित विषमुक्त शेती बद्दल जागरूकता निर्माण करणे.३. शेतकन्याना शेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करणे.४. गोबर गस ची निर्मिती करून जास्तीत जास्त परिवारांना LPG मुक्त करणे.५. पर्यावरणाचा बिघडणारा समतोल राखण्यासाठी नियमित अग्निहोत्र करणे.6.Cancer सारख्या दुर्धर आजारासाठी पंचगव्य चिकित्सा व उपचार पद्धती उपलब्ध करून देणे असे आहेत.
गोसेवाकांची समाजाप्रती असलेली ही समर्पन वृत्ती आजच्या प्रत्येक युवकांसाठी एक प्रेरणा आहे.
“प्रत्येक युवकाला सोबत घेऊन हे कार्य असेच अखंडीत सुरू ठेवणे आणि समाज सेवेची बीजे प्रत्येक तरुणाच्या मनात रोवणे हे एकच माझे ध्येय असल्याचे केतन फिरके यांनी सांगितले”.