एन.एस.यु.आय.चा विद्यापीठावर मोर्चा

0

बिनशर्त कॅरिऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा लढा

जळगाव । जिल्हा एन.एस.यु.आयतर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी बिनशर्त कॅरीऑन लागू करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा काढण्यात आला.या नियमामुळे अभियांत्रिकीच्या जवळपास ३५००-४००० विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सर्व अभियांत्रिकी महाविद्याल पुढील वर्षापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नांदेड व औरंगाबाद विद्यापीठाने कॅरीऑन नियम त्यांच्या विद्यार्थ्यांना लागू केला. तरी उमविने देखील नियम लागू करुन त्यांचेे शैक्षणिक नुकसान होण्यापासून टाळावे, असे निवेदनाद्वारे म्हटले आहे.

यावेळी चर्चेदरम्यान उमवि प्रशासनाकडून येत्या २२ सप्टेंबरच्या होणार्‍या प्रशासना प्राधिकारणाच्या बैठकीस या नियमाबद्दल निर्णय घेऊन २५ सप्टेंबरला लागू करण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनाची पुर्तता न झाल्यास २५ रोजी कुलगुरु दालनातच उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, गोपाल येवले, दुर्गेश धांडे, हर्षल जंगले, अक्षय पाटील, चेतन सोनवणे, विवेक कुमावत यांनी दिला.