नवी दिल्ली : माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती माध्यमांना दिली. 91 वर्षीय तिवारी यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.