एन मुक्टोचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे

0

टप्प्याटप्प्याने होणार आंदोलन; न्याय न मिळाल्यास बेमूदत काम बंद

जळगाव । राज्यातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता सूधारण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही उद्दीष्टे ठररवून दिली आहेत. त्या उद्दीष्टांच्या पूर्ततेसह समान काम समान वेतन कंत्राटी पद्धती बंद करणे आदी न्याय्य मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एन मुक्टो संघटनेतर्फे एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात येवून संघटनेतर्फे उच्च शिक्षण सहसंचालक केशवराव तुपे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एनमुक्टो संघटनाध्यक्ष प्रा.डॉ.संजय सोनवणे, प्रा.बी.पी. सावखेडकर, प्रा.सुधीर पाटील, प्रा.डॉ.पी.आर चौधरी, प्रा.डॉ. मनोज गायकवाड, प्रा.डॉ.के.जी.कोल्हे, प्रा.डॉ.किशोर पवार, प्रा.डॉ.पी.बी.अहिरराव, प्रा.डॉ.शुभांगी राठी, प्रा.डॉ.अनिल पाटील, प्रा.डॉ.सी.पी.सावंत, प्रा.डॉ.सुनिल कुंवर, प्रा.डॉ.एस.टी. इंगळे, प्रा.डॉ. मनोहर पाटील, प्रा.डॉ. सचीन नांद्रे, प्रा.डॉ.दादासाहेब तोरवणे, प्रा.डॉ.भाऊसाहेब पवार, प्रा.डॉ. सुनिल गोसावी आदी प्राध्यापक उपस्थित होते.

समान काम समान वेतन; कंत्राटी पद्धत बंद करा
एनमुक्टो तर्फे विविध न्याय्य मागण्याची सनद शिक्षण सहसंचालकांकडे केली होती त्यात राज्यशासनाने उच्च शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे तात्काळ भरावीत. 71 दिवसांचे बेकायदेशिररीत्या थांबविण्यात आलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे. ग्रंथपाल , शा.शिक्षण संचालक यासह सर्व शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करावा, नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून देय थकबाकीसह 100 टक्के निधी उपलब्ध करावा, विनाअनूदानीत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना सर्वोच्च न्यायालय आदेशानूसार पूर्ण वेतन अदा करावे आदी मागण्या मान्य न झाल्यास पुढच्या टप्प्यात 31 ऑगस्ट पर्यत शांततेच्या मार्गाने आंदोलन, 4 सप्टेबर रोजी स्वतःला न्यायालयीन अटक करवून घेणे, 5 सप्टेबर उच्च शिक्षण मंत्र्यांचा जेथे कार्यक्रम असेल तेथे आंदोलन, 11 सप्टेबर एक दिवसीय काम बंद आंदोलन, 15 सप्टेबरपासून कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी शांततामय आंदोलन तर 25 सप्टेबरपासून अनिश्‍चित कालीन काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.