एपीएमसीत पालेभाज्यांची आवक घटली, दर वाढले

0

नवी मुंबई :- गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने सोमवारी भाज्यांच्या उत्पादनात घट झाली असता त्याचा सर्वाधिक फटका सोमवारी एपीएमसी भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांना पडला. त्याच तुलनेत मंगळवारी मात्र भाज्यांची आवक वाढलेली असतानाही भाव मात्र थोड्याफार प्रमाणात वाढले असल्याचे दिसून आले.पालेभाज्यांची आवक सोमवारच्या तुलनेत मंगळवारीही कमी झाली.

सोमवारी भुईमुग,पडवळ,बीट ची आवकच झाली नसता मंगळवारी मात्र मोठ्या प्रमाणात या भाज्यांची आवक झाली.इतर दिवसांच्या तुलनेत लिंबू ची आवक कमी झाली असून ती फक्त १७२ क्विंटल झाली.आद्रक ची आवक ५२२ क्विंटल ची असता ती १४ ते २४ रुपये किलो दराने विकण्यात आली.यावेळी भोपळ्या ची आवक वाढली असता ती तब्बल १६३० क्विंटल झाली.चवळी ची आवक घटली असता ती फक्त २४ क्विंटल झाली.फ्लावर ची आवक वाढली असता १७७८ क्विंटल झाली.गाजर आणि काकडी च्या आवक मध्ये घट झाल्याचे दिसून आले.टोमेटो च्या आवक मध्ये वाढ झाली असता तब्बल १६७१ क्विंटल आवक झाली.आवक वाढली असता मात्र त्याचे दरही वाढले असल्याचे दिसून आले.वाटणा,वालवड ची आवक कमी झाली असता त्या तुलनेत वांग्याची आवक वाढली आहे.पावसाच्या ताड्याख्याचा फटका पालेभाज्यांवर पडला असता मंगळवारीही पालेभाज्यांची आवक कमी झाली.आवक कमी झाल्याने दर मात्र वाढले असल्याने याचा फटका व्यापाऱ्यांना पडला.