एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा अनुपम खेरनी दिला राजीनामा

0

पुणे : आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन शोच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने एफटीआयआयचं अध्यक्षपदाचं कामकाज हाताळण्यासाठी वेळेचं नियोजन करणं कठीण होत असल्याने अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर राजीनामा दिल्याचं पत्रक ट्विट केलं आहे.

मुंबईत मंगळवारी एफटीआयआयच्या सोसायटीची बैठक झाली होती. अनुपम खेर देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सर्वजण चकित आहेत.