मुंबई । एफसीव्ही इंटरनॅशनल फुटबॉल अकॅडमीच्या ए-लीगचे माजी प्रशिक्षक टोनी वॉल्म्सली यांनी 28 सप्टेंबरला मुंबईत विविध ठिकाणी मएफसीव्ही इंटरनॅशनल फुटबॉल अॅकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या एसआरएस स्पोर्ट्ससोबत ही अॅकेडमी मुंबईत सुरू करण्यात येईल. येत्या गुरुवारपासून या फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला सुरूवात करण्यात येईल. यामध्ये भारतीय 12 वर्षांखालील मुलांचे टॅलेन्ट, खेळण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. वॉल्म्सली यांची खास त्यासाठीच नियुक्ती करण्यात आली आहे. सांताक्रूझमधून या शिबिराला सुरूवात होईल. आठवड्यातून सहा दिवस हे शिबीरअसेल.
यामध्ये खेळाडूंचा विकास आणि कामगिरीवर भर दिला जाईल. चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या बिग किक ऑफ या सराव कार्यक्रमात वॉल्म्सली सोबत युईएफए लायसन्स होल्डर आणि क्रिस्टल पॅलेसचे इन सॅम्प्सॉन, एफसीव्हीचे आंतरराष्ट्रीय कोच आणि सहाय्यक कोच हे यांच्यासोबत मदतीला असतील. हे सराव सामने 28 सप्टेंबर गुरुवारी (दुपारी 3 ते संध्याकाळी 6), 30 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर सोमवारी (सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 ), तसेच शुक्रवारी होतील. यासंदर्भातील अधिकृत घोषणा येत्या सांताक्रूझ येथील लायन स्पोर्टस कॉम्प्लॅक्स येथे करण्यात येणार आहे.