एफसी पुणे सिटीकडून मार्सेलिन्हो करारबद्ध

0

पुणे। राजेश वाधवान समूह आणि हृतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आज आयएसएल स्पर्धेतील गोल्डन बूट विजेता फुटबॉलपटू मार्सेलो लीटे परेरा उर्फ मार्सेलिन्हो याला कराबध्द केले आहे. मार्सेलिन्होच्या समावेशामुळे आयएसएल स्पर्धेतील एफसी पुणे सिटी संघाची ताकद वाढणार आहे.

पूर्वी ब्राझीलकडून खेळणार्‍या विंगर मार्सेलिन्होने याआधी स्पेन, ग्रीस आणि इटाली या देशामध्ये लीग स्पर्धा खेळल्या आहेत. त्याने गेल्या मोसमात दिल्ली डायनामोज संघाचे प्रतिनिधित्व केले आणि या दक्षिण अमेरिकन खेळाडूने 15 सामन्यातून 10 गोल करताना 5 गोल करण्यात मोलाचा वाटाही उचलला. सुमारे दशकभरापेक्षा जास्त कारकिर्दीत मार्सेलिन्होने ऍटलेटिको माद्रिद बी, गेटाफे बी या संघासह स्कोडा कांथी एफसी, ऍट्रोनिकोस ऍथेन्स आणि कॅलेमाटामोंग या ग्रीक क्लबचेही प्रतिनिधित्व केले आहे. एफसी पुणे सिटी संघात या नव्या महत्वाच्या खेळाडूच्या समावेशामुळे आपण अतिशय आनंदित झाल्याचे एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले. मार्सेलिन्हो गोल करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीसाठी तो नेहमीच धोकादायक ठरतो असे सांगितले.