एबी डिव्हिलिअर्सने मोडला सचिन, सौरव, माहिचा विक्रम

0

मुंबई: दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. फलंदाजी करताना डिव्हिलिअर्सने पाच धावा केल्यानंतर करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. डिव्हिलिअर्सच्या नावे एक नवा विक्रम नोंद झाला असून भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीला त्याने मागे टाकले आहे. त्याने या सामन्यात शानदार ८५ धावांची खेळी करत संघाला विजयी केले.

फक्त 205 डावांत कामगिरी
डिव्हिलिअर्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 9000 धावा पूर्ण करणार फलंदाज ठरला आहे. 9000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी डिव्हिलिअर्सला फक्त 205 डाव खेळावे लागले. हा नवा विक्रम आपल्या नावे करताना डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली (228), सचिन तेंडुलकर (235), ब्रायन लारा (239), रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस (242) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी (244) यांना मागे टाकले आहे.

स्फोटक फलंदाजीसाठी ओळख
डिव्हिलिअर्स आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सर्वात कमी एकदिवसीय सामने खेळताना डिव्हिलिअर्सने हा रेकॉर्ड केला. फक्त 214 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्येही डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली (236), सचिन तेंडुलकर (242), लारा (246) आणि रिकी पाँटिंग (248) यांना मागे टाकले आहे. 9000 धावा पूर्ण करणा-या फलंदाजांच्या यादीत डिव्हिलिअर्स सरासरीमध्येही सर्वांच्या पुढे असून त्याची फलंदाजी सरासरी 53.89 आहे. सरासरीच्या यादीत डिव्हिलिअर्सनंतर एम एस धोनीचा नंबर असून धोनीने 51.14 च्या सरासरीने 9000 धावा पूर्ण केल्या होत्या.