शहादा। भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी एम.आय.एम.पक्षाला मोठा धक्का देत एम.आय.एम.पक्षाचे नेते अनिस मेमन यांचे आमदार उदयसिंग पाडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करुन घेतला.
अनिस मेमन यांचा एम.आय.एम.पक्षाला छोडचिठ्ठी देण्याचे कारण हे चारही नगरसेवक निवडुण आल्या नंतर समाज सेवा करुन गरीबनवाज कॉलनीतील नागरीकांना मुलभुत सुविधा नगरपालीका कडुन पोहचविण्याचे प्रथम कर्तव्य राहील असे जणु एक तोंडी करार केलेला होता. अनिस मेमन यांना समजले की समाजाचा किंवा गरीब नवाज कॉलनीचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करुनच विकास शक्य होऊ शकतो म्हणुन सर्वात मोठा व योग्य निर्णय घेऊन त्यांनी प्रवेश केला. प्रवेश करतांना जितेंद्र जमदाडे, दिनेश खंडेलवाल, , विनोद जैन, निहाल पठाण, लतिफदादा व पदाधिकारी उपस्थित होते.