औरंगाबाद-शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्याने भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी एमआयएम नगरसेकांला जबर मारहाण केली होती. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला सभागृहात मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.
भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. मतीन यांना सभागृहात बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांना अटक केली आहे.