एमआयडीएमकेचे नेते राज्यपालांच्या भेटीला

0

चेन्नई । तामिळनाडूतील सत्तेच्या लढाईला आता वेग आला आहे. विधानसभेत बहुमत सिध्द करण्याचा दावा एकआयडीएमकेचे नते ओ पन्नीरसेल्वम व शशिकला दोघांनीही केला आहे. या दोन नेत्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची गुरूवारी भेट घेतली. पन्नीरसेल्वम यांच्याशी राज्यपालांनी आर्धातास चर्चा केली. परंतू त्यांना कोणतेही अश्‍वासन दिले नाही. शशिकला यांच्या भेटीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

शशिकलांचा बहुमताचा दावा

राज्यपालांची भेट घेण्यापुर्वी शशिकला यांनी एआयएडीएमके पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पोएस गार्डन येथे बैठक घेतली. माझ्यासोबत पक्षाचे 134 ते 132 आमदार आहेत असा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे ओ पन्नीरसेल्वम हे 50 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करत आहेत. सत्ता स्थापनेसाठी कुणाला बोलवायचे याबाबत आता राज्यपालांना निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच शशिकला यांनी त्यांच्या गटातील काही आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केला आहे. तीन दिवसापुर्वी शशिकला यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे ओ पन्नीरसेल्वम यांनी अचानक बंड केले होते.

राजीनामा मागे घेणार

शशिकला यांनी सायंकाळी उशीरा राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर ओ पन्नीरसेल्वम यांनी सांगीतले की, ते त्यांचा राजीनामा मागे घेणार आहेत. कारण दबाव टाकून त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला होता. सध्या तरी तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी कोणतेही आश्‍वासन दिले नसून शशिकला यांच्याशी भेट झाल्यानंतरच ते आपले मत व्यक्त करतील.