भुसावळ । तालुक्यातील साकेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जळगावातील एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दोन्ही शहरांदरम्यान टाकलेल्या जलवाहिनीला सुमारे 25 पेक्षा जास्त ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात दररोज शकडो लिटर पाण्याची नासाडी होते. तरीही एमआयडीसी प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने गळती दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. उन्हाळ्यात ग्रामीण भागात जलस्त्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळू शकत नाही, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र एमआयडीसी परिसरात जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.