जळगाव। गणपतीनगर परीसरातील रहिवाशी व्हडगर दाम्पंत्याच्या विरोधात त्यांच्या भाच्यास एमआयडीसी पोलिस स्थानकातील तीन पोलिस कर्मचार्यांनी हाताशी घेवून 1 लाख रूपये द्या नाहीतर खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देणार्या तीन कर्मचार्यांविरोधात कारवाई व्हावी, अशा मागणी वैशाली विरूदेव व्हडगर ह्या लहान मुलासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.
काय म्हटले आहे निवेदनात
बिरूदेव शिवराम व्हडगर हे शहरातील गणपती नगरातील रहिवाशी असून 12 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.कॉ. नेरकर व जितेंद्र पाटील तक्रारदारच्या घरी आले. त्यांनी त्याचा भाचा राजेश पाटील याला हाताशी धरून बिरूदेव व्हडगर यांच्या विरोधात तक्रारअर्ज लिहून घेतला. त्यावेळी मी घरी नसतांना हा प्रकार घडला असून घरी आल्यानंतर हा प्रकार समजवून 22 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसस्थानकात गेल्यानंतर तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पो.कॉ. नेरकर व जितेंद्र पाटील यांनी शिवीगाळ करून धमकी देत ‘तू एक लाख रूपये दिले नाही तर तुझ्याविरूद्ध आम्ही खोटा गुन्हा दाखल करू व तुला बरबाद करू’ अशी धमकी दिल्याने घाबरून व्हडगर यांचा मित्र आनंद विद्यागर यांच्याकडून घेवून वरील तीघांना मित्र शितल काळे व प्रमोद इंगळे यांच्यासमोर दिल्यानंतरही तक्रारअर्ज दाखविला नाही.
गुन्हा दाखल करा
पुन्हा धमकावून भाचा राजेश पाटील यांच्याकडून पाच लाख रूपये घेतले असे बळजबरीने लिहून घेतले. त्यानंतर उर्वरित 4 लाख रूपये मागण्यासाठी वरील तिन्ही माझ्या घरी वेळोवेळी येवून चार लाखाची मागणी करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तरी संबंधीत पोलिस कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिस अधिक्षक यांना 14 मार्च रोजी निवेदन दिले. केली. त्यानंतर त्या तक्रारीची स्मरणपत्रे देवूनही कोणतीही करावाई न झाल्याने पतीस न्याय मिळावा यासाठी वैशाली बिरूदेव व्हडगर ह्या आपल्या मुलासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.