एमआयडीसीतील कंपनीतून रोख रकमेसह इलेक्ट्रिक वस्तू लांबवल्या

जळगाव- एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीतून दीड हजार रोख रकमेसह टीव्ही व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी हद्दीतील व्ही सेक्टरमधील महेश प्लास्टिक इंडस्ट्रिज ही कंपनी 13 मे रोजी सायंकाळी 5 ते 15 मे सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान बंद होती. चोरट्यांनी कंपनीच्या कार्यालयाच्यादरवाजांचे कुलूप तोडून टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर, लुम मोटार, गेअर मोटार यासह तीन हजार रुपये रोख असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत कंपनीचे मॅनेजर तुषार राणे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
—–

——-

—–

————
जिल्हा पोलीस दलातर्फे दिव्यांग बांधवांसाठी लसीकरण, मास्क वाटप (अँकर— फोटोसह)
जळगाव – जिल्हा पोलीस दलातर्फे दिव्यांग बांधवांसाठी लसीकरण व मास्कचे वितरण करण्यात आले आहे. यात सुमारे 50 दिव्यांग बांधवांना लस देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे संकल्पनेतून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी कोविड लसीकरण व मास्क वितरणाचा कार्यक्रम सोमवारी पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉलमध्ये झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण होते. व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, के.के.कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी, गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक दिलीप पाटील, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, उपनिरीक्षक भारत चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित माळी यांनी केले. यशस्वितेसाठी सहाय्यक फौजदार रावसाहेब गायकवाड, कॉन्स्टेबल सतीश देसले, दीपक सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या केंद्रावर ज्यावेळी लसीकरण करण्यात येईल, त्या वेळी दिव्यांग बांधवांना प्राधान्याने लस दिली जाईल, असेही अधिकार्‍यांनी जाहीर केले.

—–
कारची मालवाहू रिक्षाला धडक; रिक्षाचालक जखमी
जळगाव- भरधाव कारने धडक दिल्यामुळे मालवाहू रिक्षावरील चालक सोमवारी सकाळी साडेआठ वाजता कालिंका माता चौकाजवळील महामार्गावर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दवाखान्यात रवाना करण्यात आले.
महेश पंढरीनाथ कोळी (वय 23, रा.रामेश्‍वर कॉलनी, मेहरुण) हे मालवाहू रिक्षा (क्र.एमएच 19 सीवाय 6371) मध्ये पाण्याचे जार घेवून जात होते. या मार्गाने रोहित संजय फालक (रा.विठ्ठलपेठ) हा कार (क्र.एमएच 19 सीबी 0501) ने जात होता. या कारने मालवाहू रिक्षाला मागून धडक दिली. यात रिक्षाचालक जखमी झाला. तर दोघं वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी महेश कोळी यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात रोहित फालक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहेत.