जळगाव – एमआयडीसीतील एका कंपनीचे शटरचे कुलूप तोडून आत कंपनीतील एक वॉशिंग मशीन चार लोखंडी सामान चोरून नेल्याची घटना 1 ते 2 सप्टेंबर रोजी दरम्यान घडली असून एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चौघांन संशयीत म्हणून ताब्यात घेतले. आज चौघांना न्यायालयात हजर केले असता चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, संदीप रघुनाथ सानप (वय-39) रा. लक्ष्मीनगर, मेहरूण, ह.मु. मोहाडी रोड नेहरू नगर यांचे सिध्दीका प्लास्ट नावाची कंपनी एमआयडीसीतील सेक्टर एफ-69 मध्ये आहे. 1 सप्टेंबर रात्री 11 ते 02 सप्टेंब रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अज्ञान चोरट्यांनी कंपनीचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत 30 हजार रूपये किंमतीचे वाशींग मशीन, चार लोखंडी ॲगलवर तयार केले एक 08 हॉर्सपॉवरची मोटार पंप चोरून नेले. याप्रकरणी संदीप सानप यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत नंतर एमआयडीसीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवत सोनूसिंग रमेश राठोड (वय-19) रा. सुप्रिम कॉलनी, रामदेव बाबा किराणा जवळ, भोला राकेश बागडे (वय-20) रा. सुप्रीम कॉलनी मच्छीबाजार, एकनाथ उर्फ राहुल रोहीदास राठोड (वय-19) रा. रायपूर ता.जि. आणि यासीनखॉन हुसैनखॉन (वय-46) रा. पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी या चौघांना ताब्यात घेतले. पोलीसांनी चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली दिली. चौघांना न्यायालयात हजर केले असता चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे