जळगाव – एमआयडीसी सेक्टरमधील आकाश पॉलिमर्स कंपनी परिसरातील विद्युत रोहित्रातून 12 हजार रुपये किमतीचे 400 लिटर ऑइल चोरट्यांनी लांबविले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. एमआयडीसीतील एन-121 जवळील आकाश पॉलिमर्स कंपनीसमोरील विद्युत रोहित्रापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरातील फॉल्ट शोधण्याचे काम वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी करीत होते. या डिपीतून चोरट्यांनी सुमारे 12 हजार रुपये किमतीचे 400 लीटर ऑइल लांबविले. याबाबत वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी जितेंद्र दत्तूसिंग भोळे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस कान्स्टेबल विजय पाटील करीत आहेत