मोबाईल, रोकडसह 12 हजार 250 रुपयांचा एैवज लांबविला ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव- शहरातील शाहू महाराज कॉम्प्लेक्सजवळून दोन महिलांना रिक्षात बसवून पिंप्राळा हुडको येथे सोडून दिले. यावेळी एकाने बहिणीला सोडायला नेहमी तुच कसा येतोस, असे म्हणत लफड्याच्या संशयावरुन दोन जणांसोबत रिक्षाचालकाला बेदम मारहाण करुन लुटल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजता पिंप्राळा हुडकोत घडली. मारहाण करुन तिघांनी रिक्षाचालकाचा मोबाईल, 2 हजार रुपये रोख व चांदीची अंगठी असा 12 हजार 250 रुपयांचा एैवज लांबविला आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी परिसरातील फातिमा नगरात रिक्षाचालक विकार खान मज्जिद खान वय 27 हे आई, वडी, पत्नी व मुलांसह राहतात. 16 रोजी रिक्षा घेवून घराकडे परतत असताना शाहू कॉम्प्लेक्सजवळ दोन महिला रिक्षाची वाट पहात उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील सुजाता ठाकूर ह्या खान यांच्या ओळखीच्या होत्या म्हणून त्यांनी रिक्षा थांबवून कुठे जायचे असे विचारले. ठाकूर यांनी प्रिंपाळा हुडको सांगितल्यावर खान यांनी दोघांना रिक्षात बसवून पिंप्राळा हुडको येथील बौध्द विहार येथे सोडले.
सावखेडा रोडवर घेवून तिघांकडून बेदम मारहाण
याठिकाणी सुजाता ठाकूर यांचा भाऊ पंकज सुकदेव सोनवणे हा आला. व खान यांना उद्देशून तुचा का माझ्या बहिणीला सोडायला येतोस असे विचारत संताप केला. तसेच बहिण व रिक्षाचालक यांच्या संबंधांबाबत संशय घेवूून पंकज सोनवणे याने त्याचे मित्र मनोज रमेश भालेराव, हितेश नाना बाविस्कर यांच्यासोबत खान रिक्षाचालक खान यांना धमकी देत पुढे थांब आम्ही मागून येतो व तुला दाखवितो अशी धमकी दिली. भितीने खान यांनी सुजाता ठाकूर यांना विनंती करत पिंप्राळा येथे सोडावयास सांगितले. त्यामुळे सुजाताही रिक्षात बसल्या. सावखेडा रोडवर पंकजसह तिघांनी रिक्षा थांबविली. खान यांना उतरविले व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर 10 हजाराचा मोबाईल, 2 हजार रुपये रोख व 250 रुपयांची चांदीची अंगठी असा 12 हजार 250 रुपयांचा एैवज लुटून नेला. व पसार झाले. मारहाणीत खान यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. यानंतर त्यांनी त्यांचे काका सलाउद्दीनसोबत पोलीस स्टेशन तिघांविरोधात तक्रार देली. त्यावरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.