पिंपरी : एमआयडीसी परिसरात वारंवार खंडीत होणार्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन वीज वितरण अधिकार्यांनी दिले. वीजग्राहक दिनानिमित्त वीज विषयक समस्या मांडण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व वीज वितरण अधिकारी यांच्यात ही बैठक झाली. तळवडे, कुदळवाडी, चिखली डी-3, ब्लॉक फ -2, सेक्टर 7 आणि 10 तसेच टी, एस. डब्ल्यू, जे ब्लॉक, शांतीनगर, पवना कॉम्पलेक्स, मोशी टोलनाका वीजवाहक तारांची दुरुस्ती होत आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडीत होत आहे. वीजवाहक तारांना अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या छाटणी तसेच उघड्यो डीपी बॉक्सला झाकणे लावून दुरुस्ती आदी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. बैठकीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.