जळगाव- एमआयडीसीतील एम सेक्टरमधील एका 60 वर्षीय महिलेने आजाराला कंटाळून शनिवारी दुपारी 2.40 वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एमआयडीसीतील भारत गॅसजवळील सुधाकरनगरामधील एम सेक्टरमधील सिंधूबाई वामन बुनकर (वय 60) या दीर्घ आजारामुळे त्रस्त होत्या. त्यांनी या आजाराला कंटाळून शनिवारी दुपारी घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास महेंद्र पाटील, शांताराम पाटील करीत आहेत.