जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रताप शिकारे यांची प्रमोशनवर बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अमळनेरचे प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी आदेश काढले असून त्याबाबत त्यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दुजोरा दिला.
शिस्तप्रिय अधिकार्यांकडे एमआयडीसीची धूरा
अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून निरीक्षक जयपाल हिरे यांनी आजवर काम केले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी हिरे हे पदभार घेण्याची शक्यता आहे.