एमआयडीसी पोलीस ठाण्यातच झाला दोन गटात राडा

0

पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज 

धर्मस्थळात येण्याजाण्यावरुन फुटले वादाला तोंड

जळगाव- मेहरुण परिसरातील रजा कॉलनीत गुरुवारी धर्मस्थळात येण्या जाण्यावरुन वाद होवून दोन गटात हाणामारी झाल्या. याबाबतची तक्रार देण्यासाठी आलेले दोन्ही गट एमआयडीसी पोलीस ठाण्यातच भिडल्याची घटना दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी ठाण्याच्या आवारातच सौम्य लाठीचाज करण्याची वेळ आली.

काय झाला वाद
रजा कॉलनीत गुरुवारी सकाळी 11 वाजता धर्मस्थळाचा नुरखान जमाल मुलतानी यांनी गेट बंद करुन घेतले. यावरुन मुक्तार पटेल यांनी मुलतानीयांना याठिकाणी लहान मुले शिकण्यासाठी गेट का बंद केले, असा जाब विचारल्याने नुरखान मुलतानी यांच्या मुलांनी पटेल यांना मारहाण केली.

काही वेळाच दोन्ही गटाचा जमाव जमला
पटेल हे मारहाणीबाबत मुलतानी विरोधात तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले. ठाणे अंमलदार संतोष सोनवणे हे तक्रार नोंदवून घेत असताना यावेळी मुलतानीही याठिकाणी पोहचले. याठिकाणी दोघांमध्ये भांडण, आरडाओरड झाली. याचदरम्यान दोन्ही गट बाहेर येवून त्यांच्यात पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी झाली. दोन्ही बाजून जमाव जमल्याने गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

महिलांकडून पोलीस निरिक्षकांना अरेरावी
तक्रार दाखल करतेवेळी दोन्ही गटाच्या महिलाही पोलीस ठाण्यात आल्या. पोलीस ठाण्यातच याठिकाणी दोन्ही बाजूकडून महिला मोठ्या भांडण करायला लागले. यावेळी महिलांकडून पोलीस निरिक्षकांवर संतप्त भावना व्यक्त केल्या तसेच अरेरावीची भाषा वापरल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही बाजूकडील काही जण गर्दी करुन उभे होते

सर्वाविरोधात गुन्हा दाखल अन् दुचाकीही केल्या जप्त
पोलीस ठाणे आवारात झालेल्या हाणामारीबाबत पोलीस नाईक दिपक देवराम चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नुरखान जमाल खान मुलतानी, सादीक खान मेहबूब खान, अन्वर मुलतानी नशीनबी नुरखान मुलताणी, नाजीफ खान नुरखान मुलतानी, दाणिश नुरखान मुलताणी, सर्व रा. रजा कॉलनी तसेच दुसर्‍या गटाचे मुक्तार जबार पेटले, शबीर समशेर पटेल, शोराब अब्दुल पटेल, वसीम शकील पटेल, वसीम फिरोज पटेल, रियाज अब्दुल, आसिमाबी रफिक पटेल, रईलाबी सलीम पटेल, हसीनाबी अब्दुल पटेल सर्व रा. रजा कॉलनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांकडून संबंधितांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या