एमएमआरडीएकडून अंतर्गत वाहतुकीचा सर्व्हे

0

विरार । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएकडून प्राधिकरणाच्या अंतर्गत असणार्‍या रस्त्यावरील वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीचा सर्वे ली असोसिएशन साऊथ एशिया प्रा. लि. कापूरबावडी ठाणे या खाजगी कंपनीमार्फत करण्यात येत आहे. यामध्ये प्रवासी वाहने, माल वाहतूक करणारी वाहने, खाजगी व रस्त्यावर धावणारी इतर वाहने यांचा सर्वे करण्यात येत असून प्राधिकरणांतर्गत येणार्‍या रस्त्यावरील 29 ठिकाणावर 29 सप्टेंबर पर्यंत सोमवार ते शुक्रवार या दिवशी हा सर्वे करण्यात येत आहे.

यासाठी सर्वेअर रस्त्यावरील वाहतूक करणार्‍या वाहनांना थांबवून सदर वाहन कुठून आले, कुठे जात आहे, वाहन प्रवासी आहे माल वाहतुकीचा आहे, व इतर आवश्यक माहिती, माहिती तक्त्यांत नमूद करत आहेत. अश्या प्रकारचा सर्वे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोपर ओव्हर ब्रिज व शिरसाड अंबाडी रस्त्यावरील मांडवी या दोन ठिकाणी 11 सप्टेंबर रोजी सर्वेअर करत होते. रस्त्यांच्या मानाने रस्त्यावरील वाहतुकीचा भार किती आहे हे या सर्व्हेतून स्पष्ट होणार असल्याचे ली असोसिएशनचे डेप्युटी प्लानर इशान रणदिवें व असिस्टन इंजिनियर विनय राईनी यांनी सांगितले.