उरण : अंबानीच्या सेझ ला धुडकावून लावलेले शेतकरी शासनाच्या एम एम आर डी ए च्या विकास आराखड्या विरोधात एकवटले आहेत. याबाबतच्या दुसर्या सत्रातल्या बैठकांची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केली असून येत्या रविवारी चिरनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि प्रसिद्ध नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू हे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बड्या भांडवलदारांच्या नजरा असलेल्या या जमिनी आजच वाचवून भविष्यातल्या मुबईत आपल्या लेकराबाळांसाठी देखील जमीन राखून ठेवण्याचे आवाहन यावेळी केले जाण्याची शक्यता आहे चिरनेर येथे येत्या रविवारी दुपारी ३ वाजता होणार्या शेतकर्यांच्या जाहीर सभेला परिसरातील सर्व शेतकर्यांनी मोठया प्राणात उपस्थित राहण्याचे आवाहन 20 गाव सन्वयक रुपेश पाटील यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील महामुबंई सेझ चा प्रकल्प येथील शेतकर्यांनी माजी न्यायूर्ती सावंत साहेब आणि बी जी कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱयांनी धुडकावून लावला होता . त्यावेळी सरकार कडूनही अनेक आमिषे दाखविण्यात आली होती मात्र ती सर्व धुडकावून लावत शेतकर्यांनी आपल्या जमिनी अंबानींच्या सेझला देण्याचे सपशेल नाकारले होते त्यामुळे देशातील बडा भाडंवलदार असलेल्या अंबानीला आपला महामुबई सेझ प्रकल्पच गुंडाळावा लागला होता त्यामुळे या भागातील शेतकऱ्ययावर बड्या भांड्वलदाराचा डोळा आहे . या पार्श्वभूमीवर आता त्याच जमीननीवर आता सरकारकडून एम एम आर डी ए च्या माध्यमाने विकास आराखड्याच्या मी मागच्या दाराने भाडंवलदाराना कब्जा करायचा आहे त्यासाठी सरकारही पायघड्या घालू लागले आहे त्यातूनच एम एम आर डी ए ने आता पानवेलपासून ते थेट अलिबाग पर्यंत विकास आराखडा जाहीर केला आहे . ज्यातून शेतकऱ्याचा फायदा नाही मात्र भाडंवलदाराच्या घशात ही भविष्यातली तिसरी मुबई जाऊन येथील स्थानिक मात्र उपऱ्या होण्याचा धोका बळावला आहे एम एम आर डी ए च्या त्या आराखड्या विरोधात येतील बहुतांशी शेतकर्यांनी आपल्या हरकती ही दाखल केल्या आहेत.सुमारे साडेआठ हजार पेक्षा जास्त शेतकर्यांणी आपल्या हरकती यापुर्वीच नोदविल्या असून या हरकतीची सुनावणी तालुकास्तरावर करण्यात यावी अशी येथील शेतकर्यांची मागणी आहे. आंदोलनाची पहिली पायरी पूर्ण झाली आहे आता दुसर्या सत्रात आंदोलनाची दिशा काय असेल , एम एम आर डी ए ने तयार केलेला हा आराखडा कशा प्रकारे शेतकरी वर्गाला घातक आहे याबाबतचे मार्गदर्शन या शेतकर्यांच्या जाहीर सभेतून मिळणार असल्याने या जाहीर सभेला जास्तीत जास्त शेतक़र्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन 20 गाव परिसराचे सन्वयक आणि पुर्व भागातील नसेचे विभाग अध्यक्ष रुपेश पाटील यांनी बोलताना केले आहे .या मेळाव्याला माजी नियोजनकार चंद्रशेखर प्रभू यांच्यासह माजी न्यायमूर्ती बी जी कोळसेपाटील , आमदार मनोहर भोईर , माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील , शैलेंद्र कांबळे , मनवेल तुस्कानो , राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील , मनसेचे संदेश ठाकूर आदी उपस्थित राहणार असून चिरनेर येथील एम एम आर डी ए च्या विरोधातील सब हा ही सर्वपक्षीय सभा असून या सभेला जास्तीत जास्त शेतकऱयांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुधाकर पाटील , रुपेश पाटील आदिंनी केले आहे .