अलिबाग । अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या एमएमएस 2017 च्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख एमबीएचे प्राचार्य अनुजकुमार मिश्रा, रॅडीसन हॉटेलचे मॅनेजर विशाल जगवार, एचआरचे प्रमुख इर्शतनुर सिद्दीकी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सला फारसे महत्त्व नव्हते. परंतू आज हा कोर्स एक व्यवसाय म्हणून ठरू लागला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होत आहे. करिअर करताना योग्य दिशा देऊन काम केल्यास व्यवसायात प्रगती चांगल्या पध्दतीने होते. त्यात मान सन्मानही मिळतो, असे मान्यवरांकडून सांगण्यात आले.